औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेच पाहीजे,अकोल्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेच पाहीजे,अकोल्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेच पाहीजे, अशा घोषणा करीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकोला बसस्थानकावर केले आंदोलन केले.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात यावे, तसेच औरंगाबाद शहराचा उल्लेख असलेल्या प्रत्येक एसटी बसच्या पाटीवर छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख असावा, या मागणीसाठी शिवसैनिकांनी शहरातील मुख्य बसस्थानकावर आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी बसस्थानकावर उभ्या असलेल्या औरंगाबादला जाणा-या बसवर औरंगाबाद लिहीलेल्या पाटीवर छत्रपती संभाजी नगर असे स्टिकर लावले. तसेच काही उभ्या असलेल्या औरंगाबादच्या बसेसवर यावेळी ऑईल पेन्टने छत्रपती संभाजी नगर असे लिहीण्यात आले. औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजी नगर’ झालेच पाहीजे, शिवसेना जिंदाबाद यासारख्या घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेच पाहीजे,अकोल्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

अकोला पश्चिम शिवसेनेतर्फे सांगण्यात आले की येणाऱ्या दिवसात औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजी नगर न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अकोला पश्चिम शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा शिवसेना संघटक संतोष अनासने शिवसेना संघटक तरुण बघेरे युवा सेना माजी शहरप्रमुख सागर भाऊ भारुका शिवसेना उपशहर प्रमुख गजानन चव्हाण बबलू उके रुपेश ढोरे युवा सेना उपशहर प्रमुख देवा गावंडे सुनील दुर्गे मोटू उर्फ लक्ष्मण पंजाबी देविदास बोदडे संजय अग्रवाल व असंख्य शिवसैनिक शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख प्रभाग प्रमुख आवर्जून उपस्थित होते.

व्हिडिओ बातमी पहा चॅनल लिंक वर क्लिक करा

 

Leave a Comment