महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आढावा बैठक

Spread the love

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांसह भव्य मिरवणूक,महाराणा प्रताप सेवा समितीची आढावा बैठक संपन्न

महाराणा प्रताप जयंती

अकोला :- महाराणा प्रताप यांच्या ४८४ व्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा निघणार असून शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पूजनसह सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता रविवारी (दि. २ जून) रोजी स्थानिक महाराणा प्रताप बगीच्यात सेवा समितीची आढावा बैठक संपन्न झाली.

येत्या ९ जून रोजी महाराणा प्रताप यांची ४८४ वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त दरवर्षी महानगरात महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेत सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यावर्षी सुद्धा शहरात विविध ठिकाणी प्रतिमा पूजन सह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सकाळी ८ वाजता सिटी कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बगीच्यात प्रतिमा पूजन , सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबिर, तदनंतर रजपुतपुरा येथे सकाळी १०.३० वाजता प्रतिमा पूजन, सकाळी ११ वाजता अनिकट येथे प्रतिमा पूजन, ११.३० वाजता कौलखेड येथे प्रतिमापूजन व अल्पोपहार आणि सायंकाळी ६ वाजता महाराणा प्रताप बगीच्यातुन भव्य शोभायात्रा निघणार आहे. या सर्व कार्यक्रमात सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या आढावा बैठकीत महाराणा प्रताप सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सिंह चौहान, पृथ्वीराज सिंह ठाकूर, भोजराज सिंह बैस, प्रदीप गौर, रघु ठाकूर, अजयसिंह परमार, बादलसिंह ठाकूर, विजयसिंह गौर, आश्विन बैस,संजय ठाकूर, सुरजसिंह चौहान, संतोष ठाकूर, रवींद्र गौर, धर्मेंद्र चंदेल, श्याम तवर, सुभाष ठाकूर, प्रवीण ठाकूर, कुलदीप ठाकूर, चंदन ठाकूर, श्याम ठाकूर, रणजित चौहान, कुलदीप चंदेल, विजय चौहान, राजेश चंद्रवंशी, नंदू बैस, रविंद्रसिंह कछवाह, रवी गौर, राजू ठाकूर, अजय ठाकूर, देवेंदेसिंह बैस यांच्यासह महिला मंडळ, पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक आघाडी करणार शोभायात्रेचे नेतृत्व

महाराणा प्रताप जयंती निमित्त निघणाऱ्या भव्य शोभायात्रेचे नेतृत्व हे युवक आघाडी करणार असल्याचे बैठकीत ठरले. शोभायात्रा मार्गावर विविध सुविधा, महिलांची सुरक्षा आणि अन्य बाबींची देखरेख युवक आघाडी करणार आहे. त्यामध्ये संदीप ठाकूर, राजकमल चौहान, नवज्योत बघेल, सूरज ठाकूर, पप्पू ठाकूर, गौरव चौहान, सौरभ चौहान, आकाश ठाकूर, समीर ठाकूर यांच्यासह बहुसंख्य युवकांचा सामवेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *