अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी सुरू

अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी सुरू

अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी सुरू

केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत जुन्या शहरातील अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी सुरू
अकोला 7/9/2022 : केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत ० ते ६ वयोगटातील बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील बालकांना देण्यात येणारा पोषण आहार व आरोग्यविषयक योजनांची माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी आता अंगणवाडी केंद्रातच बालकांचेही आधार कार्ड काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधार कार्डची एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व योजना जोडून त्याचा लाभ बालकांपर्यंत पोहोचविणे हा यामागचा उद्देश आहे.त्या अनुषंगाने अकोल्यातील जुने शहरातील अंगणवाड्यांमध्ये 0 ते 6 वर्षच्या बालकांचे आधार कार्ड काढणे सुरू झाले आहे. सध्या अंगणवाडीतील बालकांची माहिती शासनाला अंगणवाडी सेविकांकडून ऑनलाइन सादर केली जाते.काही महिन्यांपासून मोबाईलच्या अडचणीमुळे ही माहिती शासनापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. आता यापुढे आधार कार्डशी ही माहिती लिंक केली जाणार आहे.
AKOLA TIMES

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई;बर्फीचा साठा जप्त करून नष्ट

AKOLA TIMES
स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment