दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला दिनांक 22/09/2022

शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

अकोला : दि. 22/09/2022 रोजी बी एम पेट्रोलिंग कर्तव्यावर असलेले पोलिस अंमलदार यांना कर्तव्यावर असताना पेट्रोलिंग दरम्यान नेहरू पार्क चौक अकोला येथे फॅशन प्रो कंपनीची दुचाकी क्रमांक MH37Z0052 हा वाकडातिकडा चालत असताना दिसला, कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार दिलीप हिंगणकर बं.न १४०५ व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चिकटे बं.न २०४० यांनी सदरचे दुचाकी चालकास तात्काळ थांबवून तपासणी केली व चालकास विचारपूस केली असता चालकाच्या तोंडातून उग्र तांबट वास येत होता.

चालकाने आपले नाव किशोर श्रीराम वानखडे राहणार सोनाळा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम असे सांगितले, वाहतूक अधिकारी यांनी तात्काळ सदर दुचाकी ताब्यात घेऊन आपल्या जवळील ब्रीद अँनालायझर मशीन द्वारे चालकाची चाचणी केली व चालकास वैद्यकीय तपासणी करण्या करिता शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी सदर चालक हे दारू पिऊन असल्या बाबत लेखी अभिप्राय दिला. वैद्यकीय अधिकारी ने दिलेल्या अभिप्राय वरून चालक किशोर श्रीराम वानखडे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे मोटर वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तरी शहरातील सर्व वाहनधारकांना सुचित करण्यात येते की शहरात आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने अकोला शहरातील मुख्य मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची तपासणी चालू राहणार आहे . दरम्यान मद्यप्राशन करून किंवा कोणत्याही प्रकारचे नशा करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोटर वाहन कायदा अन्वये कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार.

तरी शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत काटेकोर पालन करूनच आपले वाहन चालवावी व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री विलास पाटील पोलीस निरीक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी केले आहे.

Leave a Comment