अकोला भाजपा खासदार धोत्रे यांची शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांना श्रद्धांजली

अकोला भाजपा खासदार धोत्रे यांची शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांना श्रद्धांजली

‘जाज्वल्य अध्यात्मिक, परखड पारमार्थिक अशा धर्मानुरागीचा इहलोकीचा प्रवास थांबला,’ अशा शब्दांत अकोला भाजपा खासदार धोत्रे यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.तसेच सातत्याने धर्म आणि राष्ट्रासाठी कार्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी दोन पिठाचे यशस्वी पणे कामकाज सांभाळून समाजाला दिशादर्शक कार्य केले त्यांच्या निधनाने न भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात आमदार गोवर्धन शर्मा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अकोला भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल,तथा कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय,

‘धर्मकार्यालाच स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आयुष्य मानले. जाज्वल्य अध्यात्म आणि परमार्थ याबाबत ते परखड विचारांचे होते. त्यांचे उपदेश, विचार पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहतील. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन,कोटी कोटी प्रणाम. ओम शांती!

Leave a Comment