विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झाली आक्रमक

विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झाली आक्रमक

विद्यार्थिनींच्या सुरक्षे साठी अ. भा. वि. प. आक्रमक .
– पं.दे.कृ.वी येथील प्रकार.

अकोला : विद्यापिठ परिसरातील मुलीच्या वसतिगृहात वेषांतर करुन मुलगा शिरला हि घटना आठ दिवसा आधी घडली परंतु विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही.

विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेत निष्काळजी करण्यात आली व यामाध्यामातून सुरक्षा संदर्भात अनेक प्रश्न एरणी वर आले संबधीत प्रकार हा गंभीर असून तो लक्ष्यात

आणून देण्या करिता विद्यार्थी परिषद ने विद्यापिठात आंदोलन केले. कुलगुरूनी निवेदन स्वीकारन्यासाठी विलंब केल्या मुळे विद्यापिठांतील कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न अ.भा.वि.प.अकोला ने केला.

विद्यापीठ हे विद्येचे मंदिर असून.विद्यापीठ परिसराची देखील गरिमा आहे. अनुशासन व नियम यांचे पालन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अश्यातच विद्यापीठ परिसरातील विद्यार्थीनींच्या वस्तीगृहात मुलगा वेषांतर करून शिरला ही गोष्टी विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे त्याचबरोबर विद्यार्थीनींच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्याच बरोबर संस्कार व नैतिकता याची पायमल्ली विद्यार्थ्यांना कडून होत आहे. विद्यापीठाच्या शिक्षानातून ह्या गोष्टी देण्यात कमी पडत आहेत का असं देखील वाटत आहे . संपूर्ण घटना ही दिवसा घडली असून अशा प्रकारे भविष्यात घटना घडू नये याची काळजी घेतली पाहिजे.या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकारीयांच्यावर तीव्र कारवाई करण्यात यावी य विद्यार्थिनी वसतिगृहाच्या रेक्टर व यांच्यावर कारवाई करण्यात यावी विद्यापीठाची सुरक्षा वाढविण्यात यावी.भविष्यात असा निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

यावेळी महानगर मंत्री विराज वानखडे, महानगर सहमंत्री जयकुमार आडे, महानगर महविद्यालय प्रमुख अभिजित पानबिहाडे, कार्यालय मंत्री आदित्य पवार, देवयानी गोडबोले, निखिल यादव, सुमंत पांडे, गौरव नस्करी, अथर्व जोशी, ओम बोबडे,श्रीनिवास उईके, मनोज साबळे,अनिकेत पजई ,आदित्य केंदळे, देवाशिश गोतरकर, इत्यादी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment