हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

अकोला,दि.7(जिमाका)- भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 11 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  सततच्या पाऊसामुळे काटेपुर्णा, वान, दगडपारवा, पोपटखेड, मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पातुन कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्याअनुषंगाने या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.

AKOLA TIMES


AKOLA TIMES

 

CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment