सिंधी कॅम्‍प मध्ये अतिक्रमणावर चालला गजराज

सिंधी कॅम्‍प मध्ये अतिक्रमणावर चालला गजराज

मनपाव्‍दारा सिंधी कॅम्‍प येथील अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई.

अकोला दि. 6 सप्‍टेंबर 2022 – अकोला महानगरपालिका दक्षिण झोन अंतर्गत सिंधी कॅम्‍प झुलेलाल पाणपोई ते शासकीय गोदाम पर्यंतचे रस्‍त्‍यावर तसेच नाल्‍यावर करण्‍यात आलेले कच्‍चे व पक्‍के स्‍वरूपाचे अतिक्रमणे तसेच दुकानासमोरील टीनशेडचे अतिक्रमणे याचसोबत वाहतुकीस अडचण निर्माण करणा-या हात गाड्यांचे अतिक्रमणावर आज दि. 6 सप्‍टेंबर रोजी मनपा दक्षिण झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाव्‍दारे निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.

सिंधी कॅम्‍प मध्ये अतिक्रमणावर चालला गजराज

या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, दक्षिण झोन सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, कनिष्‍ठ अभियंता प्रतीक कटियारमल, अतिक्रमण विभागाचे करण ठाकुर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे  आदिंचा समावेश होता. 

 

Leave a Comment