अपंगाना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दया….

अपंगाना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दया अशी मागणी अपंग सेल च्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली

अपंगाना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दया….

अकोला : शासनाने अपंग व्यक्ती समान संधी , हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम , १९९५ मधील कलम ४३ अन्वये निवासी,वाणिज्यिक व औद्योगिक प्रयोजनासाठी , विशेष करमणूक केंद्र स्थापन करण्यासाठी, संशोधन केंद्रासाठी प्राधान्याने व सवलतीच्या दराने शासकीय जमीन मंजूर करणे बंधनकारक आहे सदर अधिनियमातील तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना तसेच अंध व अपंगांशी संबंधित संस्थांना सवलतीच्या दराने शासकीय जमीन मंजूर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात होण्याकरीता यापूर्वी या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र अध्यापही या निवेदनाची दखल शासनाने न घेतल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज पुन्हा मोहसीन अख्तर,अध्यक्ष अपंग सेल,अकोला च्या वतीने महापालिका आयुक्त यांना आपल्या प्रलंबित मागणी चे निवेदन देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार….

Leave a Comment