Skip to content

जिल्ह्यात ३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

  • by
जिल्ह्यात ३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
बातमी शेअर करा...व लाईक कॉमेंट करा .... !

जिल्ह्यात ३ मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. 3 मार्च रोजी राबविण्यात येणार असून यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

अकोला :

पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे डॉ. भावना हाडोळे, डॉ. एस. आर. ठोसर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी विनोद करंजेकर, डॉ. अनुप चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात मोहिमेत शून्य ते पाच वयोगटातील १ लक्ष २० हजार ९० बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक गाव-पाड्यावर पोहोचून गृहभेटी देऊन बालकांना लस पाजावी. मोहिमेतून एकही बालक सुटता कामा नये. मोहिमेची विविध माध्यमातून जनजागृती करावी. मोहिमेच्या आदल्या दिवशी शाळांतून रॅली काढावी. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याबाबत कार्यवाही करावी.

भारत पोलिओमुक्त आहे. मात्र, काही देशांमध्ये पोलिओ अजूनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही या मोहिमेत आपल्या बाळाला लस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. ठोसर यांनी सादरीकरण केले.
मोहिमेत एक हजारहून अधिक बूथ असतील. दोन हजारहून अधिक पर्यवेक्षक व कर्मचारी काम करतील. मोहिमेद्वारे सर्व वस्त्यांमध्ये जनजागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *