Skip to content

दोन देशी कट्टयांसह ०९ जिवंत काडतुस जप्त…

  • by
दोन देशी कट्टयांसह ०९ जिवंत काडतुस जप्त...
बातमी शेअर करा...व लाईक कॉमेंट करा .... !

देशी कट्टयांसह ०९ जिवंत काडतुस जप्त

देशी कट्टयांसह ०९ जिवंत काडतुस जप्त (gun bullet) जप्त ; अकोट शहर पोलीसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही , पोलिस अधीक्षकांची  पत्रपरिषदेत माहिती.

अकोला : दिनांक १६ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश डी.जवरे हे डिबी पथकासह पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी आधारे मिळालेल्या माहितीनुसार
अकोट ते अकोला रोडवर दोन इसमांजवळ देशी कट्ट्टा अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळताच त्यांनी सदर व्यक्तींना माहिती विचारून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ एक खाली मॅक्झीन आढळून आली.त्यांची आणखी चौकशी केली असता त्यांनी विहरित टाकलेले दोन देशी कट्टे अग्निशस्त्र व नऊ जिवंत काडतूस (gun bullet) एकलव्य आपतकालीन पथकाच्या मदतीने पंचांसमक्ष विहीरीतुन काढुन जप्त करण्यात आले.

यातील आरोपी अजय तुलाराम देठे वय २७ वर्ष राहणार. धोबीपुरा अकोट प्रफुल्ल विनायक चव्हाण वय २५ वर्ष राहणार. अडगांव बु तालुका तेल्हारा जिल्हा, अकोला यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले.त्यांचेविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मास्टरमाइंड असलेला तीसरा आरोपी नामे शुभम रामेश्वर लोणकर वय २५ वर्ष, राहणार नेवरी तालुका. अकोट, जिल्हा. अकोला हल्ली मुक्काम.भालेकर वरती, वारजे, पुणे निष्पन्न करून त्याचा उजैन मध्यप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता तो तेथुन पसार झाला आहे.

त्यानंतर त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे येथुन ताब्यात घेवुन दि.३० जानेवारी रोजी अटक करून त्यास मा. न्यायालय अकोट यांचेकडे हजर केले असता त्याचा ३ दिवस पोलीस कोठडी मीळाली . तपासा दरम्यान आरोपी शुभम लोणकर याचे मोबाईल वरून गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल, त्याचा भाउ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गुन्हयाचा पुढील सर्वतोपरी तपास सुरू असुन पुढील तपास पोलीस स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहे. अशी माहिती आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांनी दिली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अनमोल मित्तल, सहाय्यक . पोलीस अधीक्षक, . शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोलीस निरीक्षक शतपन कोल्हे, पोलीस स्टेशन अकोट शहर यांचे मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक. कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक राजेश नवरे, पोलीस उपनिरीक्षक. अख्तर शेख, पोलीस उपनिरीक्षक, गोपाल जाधव , पोलीस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळंके . पोलीस कॉन्स्टेबल विशाल हिवरे . पोलीस कॉन्स्टेबल मनिष कुलट . प्रेमानंद पचांग , रवि सदांशिव , सागर मोरे .कपील राठोड, अब्दुल माजीद, वसीमोददीन, व चालक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव धर्म, चालक पोलीस कॉन्स्टेबल संदीप तायडे . यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *