Skip to content

मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...व लाईक कॉमेंट करा .... !

मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. २ : शासकीय निरीक्षणगृह व बालगृहात बालकांच्या उपचारासाठी मानद वैद्यकीय अधिकारी पदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

शहरातील तहसील कार्यालयासमोरील संतोषी माता मंदिरामागे शासकीय बालगृह आहे. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार अनाथ, निराधार, निराश्रीत बालके या निरीक्षणगृहात दाखल असतात. येथील मानद वैद्यकीय अधिकारी पदासाठी एमबीबीएस किंवा बीएएमएस पदवीधर अर्ज करू शकतात. बालरोगतज्ज्ञ असल्यास प्राधान्य दिले जाईल. आठवड्यातून दोनवेळा व आवश्यक तेव्हा संस्थेत यावे लागेल. अधिक माहितीसाठी ८२०८९७७५२२ किंवा ९४२३७३९३८१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *