24 तास कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना रक्षासूत्र बांधून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे गुणगौरव

24 तास कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना रक्षासूत्र बांधून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे गुणगौरव

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात 11 व 12 ऑगस्ट २०२२ रोजी अकोल्यात सामाजिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला .ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात 24 तास कर्तव्यदक्ष असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या बांधून त्यांना प्रमाणपत्र ,शुभेच्छा संदेश व भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला

अकोल्यातील जठारपेठ पोस्ट ऑफिस , विद्युत भवन महावितरण कार्यालय , सिविल लाईन पोलीस चौकी ,अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन कक्ष ,शहर वाहतूक शाखा व इतर महत्त्वपूर्ण आस्थापनांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना रक्षासूत्र बांधण्यात आले ,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ,दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल त्यांना माहिती दिली ,त्यांच्या कार्याला जनतेसमोर नेण्यासाठी जनजागृती केली.भावना कृतज्ञतेची, राखी दिव्यांगांची या उपक्रमाला सर्व कार्यालयाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला* जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंग तुषार वारे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संपूर्ण भारतात राबविण्यात येणाऱ्या कार्याची स्तुती केली व पुढील कार्याला नेहमी सहकार्य करू असे आश्वासन दिले .या सामाजिक उपक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे सदस्य प्रा.विशाल कोरडे ,अनामिका देशपांडे ,तृप्ती भाटिया ,विजयकुमार वणवे ,पूजा गुंटीवार ,आम्रपाली बलखंडे ,रश्मी मारके ,नेहा पाल,सुजाता नंद ,वैशाली सोनकर ,स्मिता अग्रवाल, व राजेंद्र सोनकर यांनी सहभाग नोंदवला.

Leave a Comment