13 ऑगस्‍ट रोजी मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्‍या व्‍दारे भव्‍य तिरंगा रॅलीचे आयोजन.

13 ऑगस्‍ट रोजी मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्‍या व्‍दारे भव्‍य तिरंगा रॅलीचे आयोजन.

अकोला दि. 10 ऑगस्‍ट 2022 – केंद्र व राज्य शासनाच्‍या निर्देशाप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “स्वराज्य महोत्सव’’ म्हणून  दि. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022  या कालावधीत अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे राबविण्यात येत आहे. त्‍या अनुषंगाने दि. 13 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11 वाजता अकोला महानगरपालिका अधिनस्‍त असलेल्‍या अधिकारी/कर्मचारी यांच्‍या व्‍दारे शहरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्‍येक नागरिकाने आपल्‍या घराचर तिरंगा ध्‍वज फडकवून या राष्‍ट्रीय उपक्रमात सहभागी होण्‍याच्‍या दृष्‍टीने जनजागृती करण्‍याकरिता भव्‍य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदर रॅली, सिटी कोतवाली ते कपडा बाजार ते ताजनापेठ ते मोहम्‍मद अली रोड ते फतेह चौक ते टॉवर चौक ते मुख्‍य बस स्‍थानक ते गांधी रोड वरून अकोला महानगरपालिका मुख्‍य कार्यालय येथे राष्‍ट्रगीताने समारोप होणार आहे.

तिरंगा रॅलीचे सुरवातीला न्यु फेमस म्युझिकल बँड पार्टी यांचे पथक राहील, त्यांनंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी कार्यालयीन गणवेषात उपस्थित राहील, त्यानंतर सर्व आरोग्य निरीक्षक कार्यालयीन गणवेषात उपस्थित राहील. त्यानंतर सर्व विभागाच्या महिला कर्मचारी (महिला सफाई कामगार) उपस्थित राहील, त्यानंतर प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख आपले अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांसह विभाग निहाय उपस्थित राहील. त्यानंतर सर्व सफाई कर्मचारी तिरंगा रॅलॉमध्ये उपस्थित राहील. 

Leave a Comment