वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा
अकोट प्रतिनिधी
अकोट : दर गुरुवारी भाविक संत गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर अकोली जहागीर येथे दर्शनासाठी येतात आज रक्षाबंधन गुरुवारी आले हा योग साधून वारीतील महिलांनी सद्गुरु गजानन महाराज यांना राखी बांधली सोबतच वृक्षांनाही राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प केला या अनोख्या रक्षाबंधनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे .
रक्षाबंधन बहिणीचा पाठीराखा भाऊ त्यांच्या प्रेमाचा आदराचा हा सोहळा आपल्या सर्व प्राणीमात्रांचा पाठीराखा ईश्वर आणि त्यांनी निर्माण केलेला निसर्ग आहे. मानव व निसर्गाचे प्रेम अतूट राहावे व प्रत्येक माणूस हा निसर्ग रक्षक व्हावा या संकल्पनेतून रक्षाबंधनाच्या निमित्याने महिलांनी मंदिर परिसरातील वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.  माजी मुख्याध्यापिका सौ. मायाताई कराळे यांनी स्वत: बनविलेल्या राख्या वृक्षांना बांधण्यात आल्यात हे विशेष.य या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतं निसर्ग रक्षणासाठी हा एक आदर्श आहे अशी नागरिकांत चर्चा आहे.
सौ मायाताई अंगदराव कराळे, सौ संगीता धनंजय वाघ, इंजिनिअर प्रिया शिवशंकर जायले,ईश्वरी संदीप मेहरे, कल्पना संजय जायले, अर्चना अरविंद गाडखे, मंदा माणिकराव जायले,वर्षा अरविंद जायले, वैशाली पुरुषोत्तम अरबट, मेघा दादाराव जवंजाळ, नीलिमा रामकृष्ण जायले, चंद्रकला मधुकर जायले, कान्होपात्रा साहेबराव जायले, मीना सुरेशराव जायले, सुनंदा गोपालराव जायले,तन्वी जायले भूमिका जायले,आराध्या जायले  भक्ती मेहरे, रिया लाहोरे, साक्षी खिरकाळे, अनन्या विखार यासह  मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

Leave a Comment