अकोल्यात रणपिसे नगरमध्ये सेवानिवृत्त अभियंत्याची निर्घृण हत्या झाली आहे… आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला असून संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण आहे.
अकोला – शहरातील रणपिसे नगरमध्ये दिनांक 2 जून रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडलेल्या थरारक हत्याकांडाने खळबळ उडाली. मुरलीधर टॉवर्स समोर खुर्चीवर बसलेल्या 60 वर्षीय सेवानिवृत्त अभियंता संजय कौशल यांची ऐका पवार नावाच्या गुन्हेगाराने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली.त्यात कौशल यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन पथके आरोपीच्या शोधात रवाना केली. घटनास्थळी आमदार रणधीर सावरकर यांनीही भेट देत पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले. कौशल यांचे कुटुंब सध्या परदेशात असून हत्येचं नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे. शांत परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.