मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू

शिक्षण

मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू

अकोला, दि. २६ : सामाजिक न्याय विभागाच्या अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

या वसतिगृहात ११ वी, पॉलिटेक्निक व आयटीआय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

अकोल्याचा रहिवाशी नसलेल्या मात्र, अकोला महापालिकेच्या सीमेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. इच्छूकांनी एस. एस. लव्हाळे, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, संतोषी मातेच्या देवळाजवळ, हनुमान वसाहत, अकोला येथे संपर्क साधावा. वसतिगृहाचा संपर्क क्र. ९९२१६९७०५३ असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *