महाबीज’तर्फे बीटी कापूस बियाण्याच्या नव्या वाणाचे लोकार्पण

Uncategorized
महाबीज’तर्फे बीटी कापूस बियाण्याच्या नव्या वाणाचे लोकार्पण

अकोला, दि.  २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र, तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी वाण महाबीज 124 या वाणाचे सहविपणन अंतर्गत संकरित बीटी कपाशी ‘महाबीटी बीजी दोन’ या वाणाचे लोकार्पण करण्यात आले.

हे वाण हे उच्च उत्पादन क्षमतेचे असून कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान  ठरणार आहे, असा विश्वास  महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला.
महाबीज संशोधित तूर बियाण्याचेही यावेळी लोकार्पण करण्यात  आले. तुरीचे एमपी व्ही 106 या जातीचे बियाणे दक्षिण भारतासाठी प्रसारित करण्यात आले आहे. या वाणाची उत्पादन क्षमतासुद्धा  उत्कृष्ट आहे. बियाण्याची मागणी दक्षिण भारतातून तामिळनाडू व कर्नाटक या राज्यातून प्राप्त झालेली आहे.  बियाणे पुरवठ्याची संपूर्ण तयारी झालेली असून त्वरितच या राज्यांना बियाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याप्रसंगी ‘महाबीज’चे संशोधन व विकास कार्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे डॉ. रणजीत सपकाळ यांनी  अभिनंदन केले. महाबीजचे महाव्यवस्थापक विजय देशमुख यांनी यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील बियाण्याची गरज लक्षात घेऊन त्या त्या पद्धतीने महाबीज संशोधन व विकास करून त्याच पद्धतीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले.  इतर पिकातही आपण बियाण्याची गरज पाहून बियाण्याचे उपलब्धता करून देण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात संकरित बीटी  कपाशी वाणाचे वितरण करण्यात आले.  सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन महाबीजचे उपमहाव्यवस्थापक श्री गणेश जी डहाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *